Home बीड बीड जिल्हा बँक निवडणूक! परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

बीड जिल्हा बँक निवडणूक! परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान परळी मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रावरच भिडले. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे मतदान केंद्रावर पोहोचल्या.

बँकेवर प्रशासन बसवण्याचं सत्ताधारी पक्षाचं कारस्थान आहे, म्हणून आम्ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. चार वाजल्यानंतरही मतदान सुरु असल्याने तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

महत्वाच्या घडामोडी –

“ सोनिया गांधी सक्रिय नाहीत ‘UPA’चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”

भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षांपासून विकास डाऊन”

“मिस्बाह उल-हक म्हणजे गरीबांचा एम.एस.धोनी”