मुंबई : ‘तान्हाजी द अनसंय वॉरियर’ चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आला आहे, असं मत अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं
या चित्रपटातील कथा राजकारणाच्या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात बदलण्यात आली आहे. ही बाब गंभीर तसेच चुकीची आहे. चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर या भूमिकेच्या मी प्रेमात होतो, त्यामुळे यावर ठोस मत मांडू शकलो नाही, असं मत सैफ अलीने व्यक्त केलं आहे.
चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना काही गोष्टी खटकत होत्या. भूमिका सोडायची नव्हती. त्यामुळे काहीच बोलू शकलो नाही. मात्र, पुढील वेळी योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य भूमिका घेण्याचे धाडस मी करेन, असंही सैफ अली खान म्हणाला.
दरम्यान, सैफ अली खानने केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सैफ अली खानने उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
रोहित आणि विराटच्या खेळीमुळे भारताचा 7 बळी राखून विजय
“उद्धव ठाकरेंना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल”
नवाब मलिकांचा भाजपला मोलाचा सल्ला; म्हणतात…
“चंद्रकांतदादा ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती”