“हर्षल पटेलची जबरदस्त हॅट्रिक! आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर 54 धावांनी दणदणीत विजय”

0
410

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 39 व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावत 165 धावा केल्या. बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी खेळी केली. कोहलीने 42 चेंडूत 51 धावा, तर मॅक्सवेलने 37 चेंडूत 56 धावांची विस्फोटक खेळी केली. तर मुंबईकडून जसप्रित बुमराने सर्वाधिक 3 विकेट्स, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्नेनं प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 18.1 षटकात 111 धावांवर ऑलआऊट झाला. बेंगलोरक़डून हर्षल पटेलने हॅट्रिक करत 4 विकेट्स पटकावल्या. युझवेंद्र चहल, ग्लेन मॅक्सवेलने 2, तर मोहम्मह सिराजने 1 विकेट घेत आरसीबीला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला.

महत्वाच्या घडामोडी –

पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार; जयंत पाटलांनी सांगितला मास्टर प्लॅन

जेवणाच्या ताटावरून उठवलं, आणखी कशावरून उठवायचं सांगा; संजय राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा डिवचलं

“2024 मध्येही उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

आमचं ठरलंय, महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here