मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आज भाजपकडून पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे. यावेळी भाजपकडून ठाकरे सरकारच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली.
“महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पत्रकार अर्णव गोस्वामी आणि हायकोर्टाने अभिनेत्री कंगना रनौत यांच्याबाबत दिलेले निकाल हे या सरकारचे वर्षपूर्तीचे कारनामे आहेत. हे निकाल पाहता या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
कुछ लोगों को सीख नहीं मिलती, उनसे अपेक्षा क्या करना; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला
ठाकरे सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीने एक चांगला लोकप्रतिनिधी, तसेच मी निकटचा सहकारी गमावला-अजित पवार
“भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की, पुन्हा ते निवडणूकच विसरले पाहिजेत”