मुंबई : सध्या कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मराठी भाषेची चीड येते असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात कलर्स वाहिनीेने माफीनाम्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इंग्रजीत पत्र पाठवलं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीत पत्र पाठवलं. या पत्रांवरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’. कलर्स वाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे., असं ट्विट करत अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’.
कलर्स वाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे.— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
महत्वाच्या घडामोडी-
सुर्यकुमार यादवची विस्फोटक फलंदाजी; मुंबई इंडियन्सचा राॅयल चैलेंजर्स बेंगलोरवर 5 विकेट्सनी विजय
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
शिवसेनेचा भगवा जरुर फडकेल, पण तो भगवा उद्धव ठाकरे यांच्या एकट्याच्याच हातात असेल- किरीट सोमय्या
मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय