Home पुणे डॉ. लागू यांच्या निधनानं ट्वीटरवर हळहळ व्यक्त

डॉ. लागू यांच्या निधनानं ट्वीटरवर हळहळ व्यक्त

पुणे : ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं कलाक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होतेय.

डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात डॉ. लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यापश्च्यात त्यांच्या पत्नी दीपा लागू आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं निधन

-भाजपनं उगाच इथं बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसै मागावे – उद्धव ठाकरे

-हे सरकार जेढवे दिवस सत्तेत राहील तेवढे दिवस वाट लावेल- चंद्रकांत पाटील

-माझी लढाई शरद पवारांसोबत होती- पंकजा मुंडे