Home महाराष्ट्र भाजप सरकरमुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं- पृथ्वीराज चव्हाण

भाजप सरकरमुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : भाजप सरकारनं राज्यावरील कर्ज सहा लाख कोटींवर पोहचलं आहे. हे कर्ज राज्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं वाटोळं झालं आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केली आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत अला आहे. त्यांना मदत देणं आवश्यक आहे. पण ही मदत राज्याच्या अवाक्याबाहेर आहे. विरोधकांनीही सरकारची आर्थिक परिस्थिती जाणून घ्यावी, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आघाडी सरकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार मदत देणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांनी सोबत येत केंद्र सरकारकडे वाढीव मदतीची मागणी  करायला हवी, असं मतही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी-

” सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मान करण्यापासून भाजपला कोणी रोखलं होतं?”

-डॉ. लागू यांच्या निधनानं ट्वीटरवर हळहळ व्यक्त

-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं निधन

-भाजपनं उगाच इथं बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसै मागावे – उद्धव ठाकरे