माझ्या भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

0
381

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. एक व्हिडिओ शेअर करत आव्हाडांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बीडमधिल माझ्या भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत. पण इंदिरा गांधींना मानणारा मी राजकीय कार्यकर्ता आहे. ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते, असं आव्हाड म्हणाले.

आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही, असंही ते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष म्हणून नाही तर लोकचळवळ आहे जी महात्मा गांधींची होती. संयुक्त महाराष्ट्रसह मुंबई झालीच पाहिजे या निर्णयामागे इंदिरा गांधींजींची प्रमुख भूमिका होती, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून मी इतक्या टोकाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं

“शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजप आजही स्थापनेसाठी तयार”

सरपंच निवडणुकीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा ‘मोठा निर्णय

..म्हणून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला एअरलाइन्समधून प्रवास करण्यास घातली बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here