Home नांदेड “शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजप आजही स्थापनेसाठी तयार”

“शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजप आजही स्थापनेसाठी तयार”

नांदेड : शिवसेनेने उद्या प्रस्ताव दिला, तरी भाजप सरकार स्थापनेसाठी तयार आहे, असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आत्ताही शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. ‘देर आये दुरुस्त आये, सुबह का भुला श्याम को आया’ आम्ही असं समजू, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्ताव देखील मनसेकडून आलेला नाही. पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवरही टिकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सरपंच निवडणुकीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा ‘मोठा निर्णय

..म्हणून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला एअरलाइन्समधून प्रवास करण्यास घातली बंदी

महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार

देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही- रुपाली चाकणकर