पुणे : पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
1 मे 2026 या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. आरोपी भीमराव कांबळे याने खाऊच आमिष दाखवत साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीचा हात धरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली होती.
अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी या गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप अधोरेखित करत उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीजन्य बाबींचा विचार करून हा निर्णय दिल्याचे नमूद केले.
दरम्यान, या निर्णयामुळे राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
सख्ख्या भावाचाच गेम? विधानपरिषद उमेदवारीवरून गोरे बंधूंमध्ये धुसफूस!

