“छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा डंका, भाजपच्या अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी केला ठाकरे गटात प्रवेश”

0
408

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

संभाजीनगर : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील शेकडो भाजपच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी शिवबंधन हाती बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. या सगळ्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीने हिसकावला; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय

दरम्यान, या पक्षप्रवेशामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका बबीता चावरिया, माजी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, माजी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमित घनगाव, माजी मंडळ उपाध्यक्ष योगेश अष्टेकर, माजी युवा मोर्चा सदस्य अजय चावरिया, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धीवर,भाजपा मंडळ अध्यक्ष बाबासाहेब कारले, भाजपा माजी मंडळ उपाध्यक्ष बजरंग पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन खान, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष उत्तम अंभोरे यांच्यासह इतरांचा समावेश होता.

महत्त्वाच्या घडामोडी –

कसब्यात भाजपला धक्का; रविंद्र धंगेकर विजयी होणार?

40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी…; रामदास आठवलेंची, शायरीतून टोलेबाजी

“ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या शत्रूला सोडणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here