मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
कोरोनाच्या काळात सध्यातरी मी राजकारणावर बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव आखला जात आहे त्याविषयी मी एकदा मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून बोलणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तरं नाहीत असं नाही. पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेलो आहे. त्याला अनुसरुन काम करावं लागतं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“सरकार चालवता येत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”
राज्य सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील
“मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवच”
…अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु; मराठा समाजाचा इशारा