Home महाराष्ट्र …अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु; मराठा समाजाचा इशारा

…अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु; मराठा समाजाचा इशारा

पंढरपूर : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर मराठा समाजाने प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच यासंदर्भात पंढरपुरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

जर 20 सप्टेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर 21 सप्टेंबरपासून मराठा समाजाच्या रोषाला सरकारला तयार रहावे लागेल. मराठा समाजातील अनेक लोक गनिमी काव्याने समाजातील आंदोलन करतील. याची सगळी जबाबदारी सरकारवर असेल, असा इशारा मराठा समाजाने या बैठकीत दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

…नाहीतर मराठा समाजाचे तरुण नक्षलवादाकडे झुकतील; संभाजी बिग्रेडचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक

“एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही”

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…