राष्ट्रवादीचा भाजपला दणका; भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
650

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपला मोठा दणका दिला.

पिंपरी-चिंचवड युवक जिल्हाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या पुढाकाराने भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप कार्यकारिणी सदस्य विजय घोडके, राजनाथ यादव, मनोज पाटील, सिद्धार्थ वासनिक, कामगार संघटना अध्यक्ष युवराज पवार आदींचा पक्षप्रवेश झाला.

दरम्यान, यासोबतच सुखदेव सोनावणे व शुभम सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली माध्यम क्षेत्रातील मान्यवर राजीव गोस्वामी, हिमांशू मलिक, सुनील कोछुतारा, सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा वास्ता, आसिफ अली शेख, इम्रान बांगडीवाला, इब्राहिम मलखानी आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पुष्पसेन राजपूत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव पहिल्या स्थानावर, तर राणेंचे तिसऱ्या क्रमांकावर

शिवसेनेचा भाजपला धक्का; दिवंगत खासदार डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

पवार कुटूंबाला काय ठेका दिला आहे का महाराष्ट्र लुटायचा?; किरीट सोमय्यांचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here