Home महाराष्ट्र चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव पहिल्या स्थानावर, तर राणेंचे...

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव पहिल्या स्थानावर, तर राणेंचे तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : येत्या 9 ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्तेच लोकार्पण केले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर पहिल्या स्थानावर आहे. तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे हे या सोहळ्याचे अध्यक्ष असतील. तर केंद्रीय लघू, सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आहे.

दरम्यान, चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातवाद रंगला होता. मात्र या वादावर आज आयआरबीने पडदा टाकला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचा भाजपला धक्का; दिवंगत खासदार डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

पवार कुटूंबाला काय ठेका दिला आहे का महाराष्ट्र लुटायचा?; किरीट सोमय्यांचा घणाघात

अजित पवार आणि बहिणींवर आयकर विभागाच्या धाडी प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…