राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

0
259

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

हुबळी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला यानंतर राज्यासह देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला. पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बोचरी टीका केली आहे.

कर्नाटकात सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. तिथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर भाष्य केले आहे.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! बेळगावातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. कलाकार देखील अंतर्गत आहे, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, हे सगळे स्क्रिप्टेड होते, असे मी म्हटले नाही. जेव्हा या चित्रपटाचा शेवट होईल, तेव्हा बोलेन, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

सांगली-कोल्हापूर महामार्गासाठी आता नवा ठेकेदार, महामार्गाचे काम युद्धीपातळीवर करणार; नितीन गडकरींचे आदेश

“कुणाला जायचंच असेल, तर थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पत्रकार परिषदेत शरद पवारांचा रोख कुणाकडे?”

शिवसेनेचा कॅप्टन अपात्र ठरणार?; सत्तासंघर्षावर मंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here