Home देश “मोठी बातमी! बेळगावातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली”

“मोठी बातमी! बेळगावातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बेळगाव : एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा बेळगावात उधळून लावण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावली आहे.

बेळगाव जवळच्या देसूर गावात काँग्रेस उमेदवारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत भगवे ध्वज घेऊन मराठी भाषिक घुसले. यावेळी घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभा उधळून लावली आहे.

ही बातमी पण वाचा : सांगली-कोल्हापूर महामार्गासाठी आता नवा ठेकेदार, महामार्गाचे काम युद्धीपातळीवर करणार; नितीन गडकरींचे आदेश

दरम्यान, बेळगावातील काही मराठी भाषिकांचा कल हा मराठी माणसांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिशेला झुकतो. कर्नाटकातील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील उमदेवार निवडणूक लढवत आहेत. मात्र असं असताना महाराष्ट्रातील नेते काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जात असल्याने काही मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“कुणाला जायचंच असेल, तर थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पत्रकार परिषदेत शरद पवारांचा रोख कुणाकडे?”

शिवसेनेचा कॅप्टन अपात्र ठरणार?; सत्तासंघर्षावर मंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, ‘हे’ महत्त्वाचं कारण आलं समोर