Home महाराष्ट्र “कुणाला जायचंच असेल, तर थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पत्रकार परिषदेत शरद पवारांचा...

“कुणाला जायचंच असेल, तर थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पत्रकार परिषदेत शरद पवारांचा रोख कुणाकडे?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला.

शरद पवारांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मात्र तरीही शरद पवार निर्णयावर ठाम राहिले. या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला असून ते राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. त्यानंतर विविध राजकीय मुद्द्यांवर शरद पवारांनी यावेळी भाष्य केलं.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा कॅप्टन अपात्र ठरणार?; सत्तासंघर्षावर मंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

‘कुणाला जायचं असेल, कोणत्याही पक्षात जायचं असेल तर कुणाचं नुकसान तर नाही. यासाठी नेतृत्वाने थांबण्यासाठी सांगण्याची काही आवश्यकता नाही, असं म्हणत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पत्रकारांनी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका, असं उत्तर दिलं. तसेच पत्रकारांनी पक्षातील काही नेते दुसऱ्या पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चांबद्दल प्रश्न विचारले. त्यावर शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

कुणाला जायचं असेल, कोणत्याही पक्षात जायचं असेल तर कुणाचं नुकसान तर नाही. यासाठी नेतृत्वाने थांबण्यासाठी सांगण्याची काही आवश्यकता नाही. अशी परिस्थिती असेल तर अध्यक्षपदावर थांबून कंट्रोल केले जाऊ शकते, यावर लक्ष दिलं पाहिजे. इतकं मला तरी समजतं, त्यामुळे आमच्या पक्षात असं काहीही नाही, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्टच सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, ‘हे’ महत्त्वाचं कारण आलं समोर

राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गाैफ्यस्फोट

अखेर ठरलं; या’ दिवशी होणार राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब?