Home महाराष्ट्र सांगली-कोल्हापूर महामार्गासाठी आता नवा ठेकेदार, महामार्गाचे काम युद्धीपातळीवर करणार; नितीन गडकरींचे आदेश

सांगली-कोल्हापूर महामार्गासाठी आता नवा ठेकेदार, महामार्गाचे काम युद्धीपातळीवर करणार; नितीन गडकरींचे आदेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या कामासाठी आता नवीन ठेकेदार नेमण्यात आला आहे. तसेच या महामार्गाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिली.

नितीन गडकरी हे गुरुवारी कर्नाटकातून कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात असलेले खासदार धनंजय महाडिकही होते. यावेळी या नेत्यांनी कोल्हापुरातील रस्ते आणि विमानतळासंदर्भात चर्चा केली.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचा कॅप्टन अपात्र ठरणार?; सत्तासंघर्षावर मंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

शिरोली पुलापासून ते सांगलीमधील अंकली या 34 किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा खर्च 840 कोटींचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्याने रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे. तसेच वाढत्या रहदारीमुळे अपघातांमध्येही वाढ झाली आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचा कॅप्टन अपात्र ठरणार?; सत्तासंघर्षावर मंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांच्या भेटीला, ‘हे’ महत्त्वाचं कारण आलं समोर

राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गाैफ्यस्फोट