55 वर्षांपुढील पोलिसांसाठी राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

0
176

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 50 वर्षावरील 23 हजार पोलिसांना स्टेशनमध्ये काम, तर 55 वर्षावरील 12 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून घरीच राहण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे,  तर या काळात त्यांचा पगारही सुरु राहणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनामुळे राज्यात पोलिसांचे अनेक बळी गेले आहेत. मृत पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार 60 ते 65 लाख रूपयांपर्यंत मदत देत आहे. तर आता यापुढील काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या उपचारसाठी डेडिकेटेड रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यातील येरवडा भागातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथील कोविड सेंटरला गृहमंत्री देशमुख यांनी भेट दिली आहे. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

महत्वाच्या घडामोडी-

पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात- अमित शहा

…आणि मगच मुलांना शाळेत बोलावावं; माजी शिक्षणमंत्र्यांचा राज्य सरकारला टोला

आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल; हसन मुश्रीफ यांचा फडणवीसांना टोला

“कोरोना संकट भारतावर असताना मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here