Home देश “कोरोना संकट भारतावर असताना मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच”

“कोरोना संकट भारतावर असताना मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच”

लखनऊ : कोरोनाचं संकट देशावर आलेलं असताना देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व लाभणं हे आपलं नशीब असल्याचं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

पंतप्रधान मोदींनी कोरोनासंदर्भातील संभाव्य धोक्याची आधीच कल्पना दिली होती. हा साथीला तोंड देण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. भारताला नाशिबाने पंतप्रधान मोदींसारखं नेतृत्व मिळालं आहे, असं म्हणत योगी अदित्यनाथ यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.

करोनाविरुद्ध योग्य वेळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जे निर्णय घेण्यात आले त्यामुळेच भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूचा दर नियंत्रित ठेवण्यात यश आला, असं योगी आदित्यनाथ म्हणले.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकराने मार्चपासूनच करोनासंदर्भातील तयारी सुरु केली होती. पंतप्रधान मोदींनी होळीसंदर्भातील कार्यक्रम स्थगित करण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी करोनाच्या संकटाची चाहूल लागली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला होता, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी युवराज सिंगने मागितली माफी!

रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला राज्य सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

अनुष्काचा हा फोटो पाहून विराट कोहली ‘क्लीन बोल्ड’; म्हणाला…