Home महाराष्ट्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला राज्य सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला राज्य सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना सरकार जबाबदार आहे, असा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अहमदनगर आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्यातील आरोग्य यंत्रणा व्यवस्थित सेवा देत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विरोधी पक्षातील कोणी काही बोललं तर राजकारण करतात असं सरकारकडून बोललं जात आहे. मात्र आपलं अपयश दाखवण्यासाठी सरकार हा प्लॅन करत आहेत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केरळ सरकारने कोरोनावर उपाययोजना करताना स्वतः 20 हजार कोटी रुपये खर्च केले. राज्य सरकार मात्र केंद्राने मदत दिली नाही अशी ओरड करत बसलं, असंही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अनुष्काचा हा फोटो पाहून विराट कोहली ‘क्लीन बोल्ड’; म्हणाला…

सोनू सूदचा चेहरा पुढे करून ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न – संजय राऊत

“मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनासारख्या प्रभावी रोगाचा मुकाबला केला”

आईचा चिमुकलीला दम; मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन, म्हणाले… आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता?