Home पुणे “मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनासारख्या प्रभावी रोगाचा मुकाबला केला”

“मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनासारख्या प्रभावी रोगाचा मुकाबला केला”

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे, असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झालं आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचं पालन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखणं शक्य झालं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

आईचा चिमुकलीला दम; मुख्यमंत्र्यांचा थेट वडिलांना फोन, म्हणाले… आमच्या शिवसैनिकांना का त्रास देता?

… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच- अतुल भातखळकर

उद्धव ठाकरे लोकप्रिय वाटत असतील तर ते चांगलंच आहे, पण… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

“रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया”