Home देश पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात- अमित शहा

पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात- अमित शहा

नवी दिल्ली : स्थलांतरीत मजुर हे आपल्या देशाचा पाया आहेत. प्रवासी मजुरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरंच काम केलं आहे. हे प्रवासी मजुरांचा अपमान करणाऱ्यांना माहित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात याची विरोधकांना कल्पना नाही, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात हे विरोधकांना माहित नाही. आयुष्यमान भारत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तब्बल एक कोटी लोकांनी पंतप्रधानांमुळे कोणत्याही खर्चाशिवाय शस्त्रक्रिया करून घेतल्या. याव्यतिरिक्त उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी महिलांना एलपीजी गॅसची जोडणी मिळाली आणि त्यांना धुरापासून मुक्ती मिळाली,” असं अमित शहा म्हणाले.

दरम्यान, अमित शहा यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे त्यांनी जनतेला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

…आणि मगच मुलांना शाळेत बोलावावं; माजी शिक्षणमंत्र्यांचा राज्य सरकारला टोला

आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल; हसन मुश्रीफ यांचा फडणवीसांना टोला

“कोरोना संकट भारतावर असताना मोदींसारखे नेतृत्व लाभले हे देशाचे नशीबच”

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी युवराज सिंगने मागितली माफी!