“नागपूरमध्ये पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागून इंजिनियरचा मृत्यू”

0
710

नागपूर : नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाॅर्न फिल्म पाहून सेक्स करण्याची विकृती एका तरूण इंजिनियरच्या जीवावर बेतली आहे. त्याने केलेल्या विचित्र पराक्रमामुळे गळफास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळ नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेला व्यक्ती 27 वर्षाचा असून तो पेशाने इंजिनियर होता. त्याचे एका 20 वर्षीय तरूणीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यामुळे प्रेमाचा आनंद लुटण्यासाठी ते दोघे फिरायला गेले होते.

दोघेही दहेगाव परिसरातील लॉजवर गेले आणि त्यांनी एक खोली बुक केली होती. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. मात्र शरीर संबंध ठेवताना त्या इंजिनियरने पाॅर्न व्हिडिओ पाहिले होते. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शारिरिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर तरुणीने त्याचे हात-पाय दोरीने बांधले. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली, यावेळी तरुण खुर्चीसह खाली कोसळला. ज्यामुळे फास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, तरुणी बाथरूममधून बाहेर आल्यानंतर तरूण मृत झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. नंतर घाबरलेल्या तरुणीने लॉज व्यवस्थापकांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

महत्वाच्या घडामोडी-

सरकार मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं; औरंगाबाद नामांतरावर संजय राऊतांचं भाष्य

“संभाजी महाराज माफ करा आम्हांला, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबाबोंब; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

नाशिकमध्ये भाजपला धक्का; 2 मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here