“लावणी कलाकार गाैतमी पाटीलच्या चेजिंग रूममध्ये चोरून चित्रीकरण, राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल”

0
457

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लावणी कलाकार गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी राज्य महिला आयोगाला याबाबत दखल घ्यावी लागली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : नामांतरास विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मनसेचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे., असं रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. , असंही रूपाली चाकणकरांनी सांगितलं.

एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील., अशी माहिती रूपाली चाकणकरांनी यावेळी दिली.

एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील.

महत्त्वाच्या घडामोडी –

“पक्षाची चोरी झाली, चिन्हाची आणि नावाचीही चोरी झाली तरीही महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे”

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला धक्का; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे सूरतला निघाल्यानंतर, उद्धवजींनी मला संपर्क केला आणि…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here