Home महाराष्ट्र भारत मजबूत आहे, मजबूर नाही- उद्धव ठाकरे

भारत मजबूत आहे, मजबूर नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले होते.

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत चीनबाबत राग व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत शांत आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी चीनला इशारा दिला.

दरम्यान, आपण सगळे एक आहोत. चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांही आमचा पाठिंबा आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना शरद पवार आणि सोनियांनी दिल्या ‘या’ सूचना

आम्ही उद्धव ठाकरेंकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

“अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला”

…म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना टोला