लंडन : जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोरोनावर अद्याप लस शोधता आलेली नाही आहे. काही देशांनी यशस्वी ह्युमन ट्रायल केलं आहे. मात्र पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं औषध सापडलं असल्याचं सांगितलं आहे.
ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत डेक्सामेथासोन औषधाचा वापर करून 2000 रूग्णांवर उपचार करण्यात आला. या चाचणीत असे आढळले की हे औषध बर्याच रुग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले आहे. हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की डेक्सामेथासोन हे असे पहिले औषध आहे जे कोरोना रूग्णांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरले आहे. डेक्सामेथासोन या औषधाने कोरोना रूग्णांवर उपचार करण्यास ब्रिटन सरकारनं मान्यता दिली आहे.
दरम्यान, डेक्सामेथासोन औषध विशेषत: व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांवर उपायकारक आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार कलाकारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल
जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; पंतप्रधानांचा इशारा
पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे; पण, काहीतरी बोला- संजय राऊत
पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी?- राहुल गांधी