Home देश पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी?- राहुल गांधी

पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी?- राहुल गांधी

नवी दिल्ली : चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. यावरून पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? ते लपून का बसत आहेत? झाले तेवढे बस्स झाले! काय झाले ते आम्हाला समजलेच पाहिजे. आपली जमीन बळकावण्याची चीनचे धारिष्ट्य कसे झाले, असं ट्टिट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. यात चीनचे 43 सैनिक ठार झाले तर भारताचेही 20 जवान शहीद झाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

शहीद जवानांना शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…

मोठी बातमी…! गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी

जॉन सीनानेही वाहिली सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली; पोस्ट व्हायरल

वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आंदोलनाची हाक