Home महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आंदोलनाची हाक

वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आंदोलनाची हाक

मुंबई : राज्यात काही दिवसांत मागासवर्गीय, बौद्ध लोकांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांप्रकरणी जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

जगामध्ये कोरोनाचं संकट उद्धभवलेलं आहे. जनजीवन ठप्प झालं आहे. अशातच महाराष्ट्रात मागासवर्गीय, बौद्ध, भटक्यांवरील अत्याचारानं कळस गाठला आहे. वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महिला आघाडी आदी 17 जून रोजी शहर, तालुका व जिल्हास्तरावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला निवेदन देणार आहे. त्यानंतर प्रत्येक तीन दिवसांनी जाब विचारणार आहे, असं वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर वरुन म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे… ; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यात काहीच मजा नसणार- विराट कोहली

वेल डन महाराष्ट्र… जयंत पाटलांनी थोपटली जनतेची पाठ; म्हणाले…

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटच्या खाटाचा बघा?”