Home क्रीडा रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यात काहीच मजा नसणार- विराट कोहली

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यात काहीच मजा नसणार- विराट कोहली

मुंबई : कोरोनानंतरही रिकाम्या स्टेडीयममध्ये क्रिकेटचे सामने खेळवण्याचा अनेक देशांचा मानस आहे. यावर भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले मत मांडले आहे.

रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळण्यात काहीच अडचण नसणार आहे. परंतु जे वातावरण प्रेक्षक असताना असते ते मात्र नसेल, असं विराट कोहली याने म्हटलं.

ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० विश्वचषक आयोजित करण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियमपासून दूर ठेवता येईल, कारण या क्षणी जागतिक आरोग्य संकटामुळे त्याच्या घटनेबाबत अनिश्चितता आहे, असं कोहली म्हणाला.

दरम्यान, हे शक्य आहे, कदाचित होईलच. खरं सांगायचं तर प्रत्येकजण ते कसे घेणार हे मला माहिती नाही कारण आपणा सर्वांना इतक्या चाहत्यांसमोर खेळण्याची सवय आहे, असं विराट कोहली स्टार स्पोर्ट्स शो ‘क्रिकेट कनेक्ट’ शी बोलत असताना म्हणाला.

महत्वाच्या घडामोडी-

वेल डन महाराष्ट्र… जयंत पाटलांनी थोपटली जनतेची पाठ; म्हणाले…

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटच्या खाटाचा बघा?”

सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर बाळासाहेब थोरातांचा पलटवार; म्हणाले…

“मी असताना कुणीही आरक्षण हटवू शकत नाही”- रामदास आठवले