Home महाराष्ट्र जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; पंतप्रधानांचा इशारा

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; पंतप्रधानांचा इशारा

मुंबई : चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. चिनी सैनिकांसबोत संघर्ष करताना हुतात्मा झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला रोखठोक इशारा देत, भारत जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं. भारताचे वीर जवान लढता लढता शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. त्यापूर्वी मोदींनी गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करुन, शहिदांना आदरांजली वाहिली.

महत्वाच्या घडामोडी-

पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे; पण, काहीतरी बोला- संजय राऊत

पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी?- राहुल गांधी

शहीद जवानांना शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली; म्हणाले…

मोठी बातमी…! गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी