Home महाराष्ट्र “कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांसाठी अनिल देशमुखांनी ‘ही’ मोठी घोषणा”

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांसाठी अनिल देशमुखांनी ‘ही’ मोठी घोषणा”

मुंबई : कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन आपलं कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

कोविड-19 विरूद्धच्या लढाईत अगदी ग्रामपातळीपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य निभावले. त्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पथक देऊन त्यांचा यथोचित सन्मान-सत्कार करण्यात येणार आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गृहमंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट करुन कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची तुलना थेट चीनच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या शौर्याशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या प्रकारे चीनविरोधात सीमेवर आपल्या सैनिकांनी जशी बहादुरी दाखवली आहे. त्याप्रकारे महाराष्ट्र पोलीस देखील कोरोनाविरुद्धच्या लढाईत दाखवत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“अखेर कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं पहिलं औषध सापडलं; WHO नं केलं ‘या’ देशाचं कौतुक”

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ‘या’ चार कलाकारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; पंतप्रधानांचा इशारा

पंतप्रधानजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे; पण, काहीतरी बोला- संजय राऊत