आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.
जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवायचा. मंत्र म्हणायचा. झोळीत हात घालायचा आणि कबुतर काढायचा. तेव्हा आश्चर्य वाटायचं. रिकाम्या टोपीतून कबुतर काढलं आपलं मत यालाच, असं आपण म्हणायचो. पण लक्षात आलं नाही की, कबुतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे, असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी
आता महिलांना फुकटात गॅस सिलिंडर देतील. निवडणुका झाल्यावर दुपटीने तिपटीने गॅसचे दर वाढतील. आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान,उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अर्थसंकल्पावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ब्रेकींग न्यूज! कोल्हापूरात शाळकरी बसच्या सहलीवर अज्ञातांकडून दगडफेक, पोलिस घटनास्थळी दाखल”
‘…त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली’; नितीश कुमार यांची प्रतिक्रिया