आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : मराठा समाजातील ज्या व्यक्तींची ‘कुणबी’ अशी निजामकालीन नोंद असेल, त्यांना इतर मागास प्रवर्गातील कुणबी दाखले दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सामाजिक न्याय विभागाने तसा शासन निर्णय काढला आहे.
ही बातमी पण वाचा : “मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे”
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष न्यायमुर्ती संदीप शिंदे तर सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, प्रधान सचिव, विधि व न्याय विभाग, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त राहणार आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
माफी मागितली म्हणजे सरकारने चुक केल्याचं मान्य केलं ;रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा
“मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा”
उद्धव ठाकरे अंतरवाली-सराटीत दाखल, दाखल होताच ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…