Home पुणे शिवसेनेच्या या नेत्याच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द

शिवसेनेच्या या नेत्याच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार प्रकरणी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कुचिक यांना ११ मार्च २०२२ रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन रद्द केला.अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी याबाबतचे आदेश दिले.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारकडून कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला

जामीन दिल्यानंतर न्यायालयाने नमूद केलेल्या अटींचे आरोपीने उल्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपीला जामीनावर सुटण्याचा अधिकार नाही. न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाचा गैरवापर होत असून कुचिक यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, कुचिक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वाँरंट बजाविण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.कुचिक यांनी न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिलेल्या अर्टी, शर्तींचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असा अर्ज पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला होता.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे”

माफी मागितली म्हणजे सरकारने चुक केल्याचं मान्य केलं ;रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा

“मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा”