Home महाराष्ट्र …तर या सरकारला ते महागात पडेल; मराठा महासंघाचा शिंदे – फडणवीस सरकारला...

…तर या सरकारला ते महागात पडेल; मराठा महासंघाचा शिंदे – फडणवीस सरकारला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  मराठा आरक्षणाविषयी चर्चेसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने नागपुरात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण द्या, त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागतेय तर वाढवा. त्याचबरोबर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर हे प्रकरण राज्य सरकारला महागात पडेल, असं दिलीप जगताप म्हणाले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेच्या या नेत्याच्या अडचणीत वाढ; बलात्कार प्रकरणातील जामीन रद्द

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ज्वलंत प्रश्न झाला आहे. तो आता मराठ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. आम्हाला आरक्षण हवं आहे. आम्हाला ५० टक्क्यांमध्ये आरक्षण द्या किंवा ५० टक्क्यांबाहेर द्या, परंतु आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या १२ दिवसांपासून संघर्ष करत आहेत. तीन दिवसांपासून ते सलाईनवर आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर या सरकारला ते महागात पडेल, असंही दिलीप जगताप यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारकडून कुणबी-मराठा आरक्षणाचा जीआर निघाला

 “मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे”

माफी मागितली म्हणजे सरकारने चुक केल्याचं मान्य केलं ;रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा