आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे केलं आहे.
राजेंद्र म्हस्के म्हणाले, ताई फेटा बांधा. मी म्हणाले, मी फेटा बांधणार नाही. कधीपर्यंत फेटा बांधणार नाही ते माहिती आहे का तुम्हाला? मराठा आरक्षणाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही. बावनकुळे साहेब, ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितलं होतं, मी गळ्यात कोणत्याही फुलाचा हार घालणार नाही. मग ते आरक्षण वाचलं. मग लोकांना दम पडला नाही. पण मी फेटा बांधणार नाही”, असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.
ही बातमी पण वाचा : “वरात दारात येऊन थांबली, अन् नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून थक्क व्हाल”
बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सूचक वक्तव्य केलं. तसेच मराठा आरक्षणासाठी आग्रहाची भूमिका मांडली.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर आम्ही थेट पंतप्रधान मोदींना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांचं मोठं विधान
“वर्ल्ड कप आधीच टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर?”