Home महाराष्ट्र “पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज”

“पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज”

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासात सहा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये 9 ते 11 जून दरम्यान तर महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये 10 ते 11 जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटक, रायलसीमापर्यंत पोहोचला आहे. तसेच बहुतांश तामिळनाडूचा भागही मान्सूनच्या पावसाने व्यापला आहे. त्यामुळे मान्सून मध्य अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक आणि कोकणाचा भाग लवकरच व्यापून टाकेल, असंही हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला- संजय राऊत

संजय राऊत यांच्या टीकेनंतर सोनू सूद ‘मातोश्री’ वर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं सोनू सूदचं कौतुक, म्हणाले…

55 वर्षांपुढील पोलिसांसाठी राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा