आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
इस्लामपूर : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीनं आपला गड राखला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीनं दणदणीत विजय मिळवला आहे. जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
ही बातमी पण वाचा : भावाचा बहिणीला छोबीपछाड; बाजार समिती धनंजय मुंडेंच्या ताब्यात
सांगलीच्या इस्लामपूर कृषी उत्पादन बाजार समितीच्या पार पडलेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 17 जागांवर बाजी मारत दणदणीत विजय मिळवला. तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने यश प्राप्त केलं आहे.
इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला. तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने यश प्राप्त केले. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार @NCPspeaks pic.twitter.com/iDpO7rRSpx
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 29, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपचा महाविकासआघाडीला मोठा धक्का; दोन ठिकाणी फुललं कमळ
भाजपला धक्का; सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा
“धनंजय मुंडेंचा जलवा, बीडमध्ये भाजपला धोबीपछाड करत राखली एकहाती सत्ता”