आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला मंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत काहीही बेताल वक्तव्य करतात. काल सागाची लाकडे चंद्रपुरातून अयोध्येकडे रवाना करण्यात आले. त्यांना कधी हे सुचलंही नसतं की सर्वोत्कृष्ट सागवान हे गडचिरोली आणि चंद्रपूरला आहे. ते श्रीरामाच्या सेवेत गेले पाहिजे असे त्यांना कधी वाटले नाही, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : जयंत पाटील म्हणाले शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; आता दीपक केसरकर म्हणतात…
श्रीरामाच्या नावाने राजकारण करायचे मात्र हिंदुत्वाला बगल द्यायचे. मालेगावात जाऊन त्यांनी काय केले, हे सगळ्या जनतेने बघितले आहे. त्यामुळे ते फक्त बोलतात, करत काहीही नाही, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी हिंदुत्व सोडले आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यामुळे त्यांनीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधले, अशी टीकाही दीपक केसरकर यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
ठाण्यात राडा! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण
शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार?; अमित शहांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…