भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता ठाकरेंच्या वाटेवर?

0
208

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच पक्षांमध्ये सध्या उमेदवारीवरून नाराजीचं सत्र सुरू आहे. अशातच आता भाजपाला विद्यमान खासदार मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपाने तिकीट कापल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असून ते ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील जळगाव लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याची बातमी समोर आली असून महायुतीविरोधात त्या ठाकरे गटाकडून आव्हान देणार असल्याची चर्चा आहे.

ही बातमी पण वाचा : शिंदे गटाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा राजीनामा

दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या सतरा जणांच्या उमेदवारी यादीत जळगाव लोकसभेतून उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवला गेला आहे. त्या ठिकाणी संपदा पाटील उमेदवार असणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

गोपाळकृष्ण शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकशाहिर युवा प्रतिष्ठानकडून क्रिकेट स्पर्धा

मनसे-भाजप युतीच्या घडामोडींवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here