Home पुणे गोपाळकृष्ण शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोपाळकृष्ण शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेत चालू शैक्षणिक वर्षात ‘गोपाळकृष्ण क्रीडा महोत्सव ‘ घेण्यात आलेला होता. या महोत्सवामध्ये धावणे, बुक बॅलन्स, लिंबू चमचा, पोते उड्या, संगीत खुर्ची या वैयक्तिक स्पर्धा आणि लंगडी, क्रिकेट,डॉजबॉल अशा सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरारीने भाग घेऊन क्रमांक पटकावले होते.

सदर महोत्सवाचे नियोजन क्रीडाप्रमुख रणजित बोत्रे यांनी केले होते. तत्पूर्वी सदर विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या सचिव डॉ. भारती डोळे, ऋजुता देसाई, शरद डोळे, श्रीकांत दाते आदी पदाधिकारी व पत्रकार ज्ञानेश्वर मोरे, बबनराव आमरुळे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून लाभले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

ही बातमी पण वाचा : लोकशाहिर युवा प्रतिष्ठानकडून क्रिकेट स्पर्धा

तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर यांच्याकडून प्रशालेस आर.ओ.वॉटर फिल्टरची मदत देण्यात आली. सदर आर.ओ.वॉटर फिल्टरचे उद्घाटन यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे व गीतांजली कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. विशाल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री कासार, गीतांजली कांबळे, दिपाली गावडे,रणजित बोत्रे,विशाल चव्हाण उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

मनसे-भाजप युतीच्या घडामोडींवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आली समोर; ‘या’ नेत्यांना मिळणार उमेदवारी

कुठल्या पक्षाकडून निवडणुक लढणार? वसंत मोरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…