आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विट हँडलवरून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांची तब्येत ठीक नसल्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रूग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे येणार असून दि. 4 व 5 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
हे ही वाचा : महायुतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रूग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करू नये, असं आवाहन शिवाजीराव गर्जे यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. #NCP pic.twitter.com/YpjqjcFw1E
— NCP (@NCPspeaks) October 31, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर अशा माणसानं मुख्यमंत्रीपदी कशाला बसायचं?; सुषमा अंधारेंचा खोचक सवाल
मोठी बातमी! गुजरातमध्ये पुल कोसळल्याने मोठी दुर्घटना; 400 लोक पाण्यात अडकल्याची भिती
आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान, म्हणाले, मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी…