“मोठी बातमी! सकाळी शरद पवारांच्या बैठकीला हजर राहणाऱ्याने ‘या’ आमदाराने दिला, अजित पवारांना पाठिंबा”

0
437

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

यानंतर राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. एक शरद पवार गट, तर दुसरा अजित पवार गट. दोन्ही गटांकडून आज मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन केलं. बहुसंख्य आमदार अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित होते. तर शरद पवारांच्या बैठकीला केवळ 13 आमदारांनी उपस्थिती लावली. ही बैठक पार पडल्यानंतर आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी पण वाचा : “अजित पवारांच्या शपथविधीच्या दिवशी नेमकं काय घडलं?; ‘या’ आमदाराने सांगितला सविस्तर घटनाक्रम”

सकाळी शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित असणारे मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी आता अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. शरद पवारांचा मेळावा पार पडल्यानंतर आमदार भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी जाऊन अजित पवारांना समर्थन दिलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित पवार यांच्यासोबत युतीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर

अजित पवार यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, तुम्ही…

शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाणार, कारण…; भाजपच्या ‘या’ खासदाराचा मोठा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here