आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला कालपासून सुरुवात झाली असून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही निवडणूक बिनविरोध करावी असे पत्र पाठवले आहे. यावर ठाकरे गटाचे येते अरविंद सावंत प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आणणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा
भाजपाची माणूसकी तर केव्हाच हरवली आहे. ते अशुद्ध मनाचे आहे. ही सत्तेसाठी हपापलेली लोकं आहेत. त्यांना दुसरं कुणाचं भलं वगैरे काहीही सुचत नाही.मात्र मनसेच्या पत्राने हा अंश कुठेतरी दिसतो याचा आनंद वाटला, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ही पहिली भूमिका मांडली त्याला थोडा उशीर झाला. असं असलं तरी ही भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची भाजपाला आठवण करून दिली हेही खूप झालं, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! अकोटमध्ये भाजपचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा
नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का; पंचायत समितीत सर्व 13 जागांवर महाविकास आघाडीने मारली बाजी