आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : ‘1996 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. यासाठी त्यांनी आमदारांना तशी मागणी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे करण्यासाठी पाठवलं होतं, असा गौप्यस्फोट शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला. ते बीडमध्ये बोलत होते.
1996 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी आमदारांचा गट तयार करून लॉबिंग केली होती. बाळासाहेब ठाकरे यांना भेटावं आणि त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यास सांगितलं होतं, असं सुरेश नवलेंनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी जोर धरला असता, मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, म्हणाले…
मनोहर जोशी यांना पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धवजी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद द्यावे, असा आग्रहदेखील केला होता, असं सुरेश नवले म्हणाले.
दरम्यान, इच्छा नसताना महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावे लागले, हा उद्धव ठाकरेंचा दावा खोटा असून, त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच होते, म्हणून ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, असंही सुरेश नवलेंनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे घाबरू नका, गद्दारांना जशास तसं उत्तर द्या; अजित पवारांकडून ठाकरेंना संघर्षाचा दाखला
राष्ट्रवादीच्या या मोठ्या नेत्याने घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण