Home महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या निकालावर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सत्तासंघर्षाच्या निकालावर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : अखेर महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने अखेर दिला. या निकालात शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळालं असून राज्यातील शिंदे सरकार वाटलं आहे.

मात्र, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांवर कोर्टानं जोरदार सुनावलं आहे. या सगळ्या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, अशी मिश्किली प्रतिक्रिया राज ठाकरेंनी यावेळी दिली. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना मोठा धक्का; राज्यात शिंदे सरकार कायम राहणार

माझ्याविरोधात केसेस सुरू असताना मला कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस यायची. त्या नोटीशीतील भाषा अत्यंत किचकट असते. त्यातून मला अटक केली की सोडण्यात आले हेच कळत नाही. काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. प्रोसेज चुकली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधीमंडळाचा गट योग्य ठरणार नाही. बाहेरचाच पक्ष राहिला पाहिजे. मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याचे काय होणार? कोर्टाचा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. भयंकर संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

…आणि शिंदें सरकार कोसळेल; नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

सत्तासंघर्षाच्या निकालाआधी, विधानसभा उपाध्यक्षांचा, 16 आमदारांबाबत मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

पंतप्रधान मोदी, अमित शहांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांची, चित्रा वाघ यांनी काढली लायकी, म्हणाल्या…