सुर्यकूमार यादवच्या तुफान शतकी खेळीनंतर, विराट कोहलीची खास मराठीत पोस्ट, म्हणाला…

0
224

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाचा आक्रमक खेळाडू सूर्यकुमार यादव याने आज शतकी खेळी केली आहे. सूर्याकुमार यादवने आपल्या करिअरमधील पहिलं शतक करत इतिहास रचला आहे.

गुजरात टायटन्सविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, सुर्याने शानदार ठोकलेल्या शतकानंतर सोशल मिडियावर अनेकांनी त्याच्या खेळीचं कौतुक केलेलं दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने खास मराठीत पोस्ट करत सूर्याच्या या खेळीचं काैतुक केलं आहे.

विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तुला मानलं भाऊ, असं म्हणत सूर्याचा एक फोटो शेअर केला आहे. कोहलीची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने आज गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात 49 चेंडूत 11 चाैकार, 6 षटकारांसह, नाबाद 103 धावांची विस्फोटक खेळी केली. सूर्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने गुजरातचा 27 धावांनी पराभव केला. तसेच सुर्याच्या या खेळीचं जोरदार सर्वस्तरावरून काैतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

सत्तासंघर्षाच्या निकालावर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना मोठा धक्का; राज्यात शिंदे सरकार कायम राहणार

…आणि शिंदें सरकार कोसळेल; नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here