आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये हलिण्यात येणार आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून महाविकास आघाडीतील नेते शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. यावरून आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार पळवले आता प्रकल्पही पळवला असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे ही वाचा : सांगलीत राष्ट्रवादीचा भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा; काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम
या प्रकल्पाचे कागदपत्र तयार होते. अर्थात केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांची सबसिडी मिळून वेदांत आणि फॉसकॉनने थोडी इनव्हेस्टमेंटची सांगड घालणं गरजेची होती. याबाबत चर्चा पुढे गेली होती.
जूनमध्ये भेट घेतली. त्याच्यानंतर आपलं सरकार चाळीस गद्दारांनी पाडलं. यामुळे हा विषय मागे राहिला असं म्हणत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील एक लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही याची जबाबदारी कोण घेतय याचे उत्तर व्यवस्थे कडून मिळालेले नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, प्रकल्प कसा गेला याचा खुलासा का झालेला नाही असे म्हणत जितके हार ने वाले को खोके सरकार कहते है, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदे-फडणवीस सरकार ‘या’ तारखेला कोसळणार”
“बंडखोरीचा शिवसेनेला फायदा; शेकडो वकिलांनी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”